देवरी / चिचगड : वनक्षेत्र चिचगड, सहवनक्षेत्र पालांदूर अंतर्गत येणारे मौजा पालांदूर व टेकरी येथे प्रांत अधिकारी (RFO) प्रशांत वाडे , चिचगड यांनी सालवणकर, वनपाल पालांदूर तसेच सर्व क्षेत्रीय वनकर्मचारी यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.
या प्रसंगी ग्रामपंचायत मगरडोहचे सरपंच विलास भोगारे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. या बैठकीत प्रशांत वाडे यांनी परिसरात बिबट प्राणी दिसल्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सावध राहण्याचे आणि सतर्कतेचे आवाहन केले. तसेच बिबट दिसताच तात्काळ जवळच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा कार्यालयाला कळविण्याच्या सूचना दिल्या.वनविभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जागरूकता वाढून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.









