देवरी: शहरात सामाजिक ऐक्य व प्रेरणादायी कार्याचा संदेश देण्यासाठी जाहिर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी, रात्री ८ वाजता, श्री शारदा उत्सव महिला मंडळ, संजय नगर, देवरी येथे हे व्याख्यान पार पडणार आहे.
या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून जितेंद्र दादा आसोले (युवा व्याख्याते, समाज प्रबोधनकार व लेखक) उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून युवकांमध्ये सामाजिक ऐक्य, तरुणाईला दिशा व एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे.कार्यक्रमात आई, वडील, महिला, पुरुष, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच सर्व तरुण-तरुणींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या व्याख्यानाचे आयोजक व मुख्य निमंत्रक लोकश दादा येवले (येवले ज्वेलर्स, देवरी) असून, हा कार्यक्रम समाज प्रबोधन व प्रेरणादायी संदेश देणारा ठरणार आहे. देवरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








