देवरी : तालुक्यात असाक्षर व्यक्तींची परीक्षा घेण्यात असून यामधे उल्लास अँप वर नोंदणीकृत असाक्षर व्यक्ती परीक्षेला बसण्यास पात्र होते. देवरी तालुक्याला 900 असाक्षर नोंदणीचे उदीष्ट्ये जिल्हा कार्यालयातून प्राप्त झाले होते यापैकी एकूण 838 असाक्षर व्यक्तीची 21 सप्टेंबर 2025 ला शाळा स्तरावर परीक्षा घेण्यात आली.
सदर परीक्षा गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली असून परीक्षा शिक्षण विभागातील गटसमन्वय डी टी कावळे, तालुका समन्वयक उमेश भरणे, गट साधन केंद्रातील विषयसाधनव्यक्ती, वरिष्ठ लेखा, डाटा ऑपरेटर तसेच केंद्रप्रमुख,विशेष शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व्हेअर शिक्षक व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने सुरळीत पार पडली.








