पावसाच्या रिमझिम सरीमध्ये रंगला गरबा, बेरोडीच्या लंक्या ने केले देवरीकरांचे मनोरंजन
देवरी: नवरात्रीच्या पावनपर्वावर देवरी येथील क्रिडासंकुलाच्या मैदानात “अ” क्रॉझ अँकडमी देवरी व माजी सभापती/जिल्हापरीषद सदस्या सविता पुराम यांनी गरबा दांडिया कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आयोजन केले होते. यावेळी महिन्याभरापासून प्रशिक्षण घेतलेल्या महिलाच्या चेहऱ्यावर उत्साह होता परंतु पावसाच्या रिमझिम सरी बरसल्यामुळे नाराजीचा सूर बघावयास मिळाला. पावसाची पर्वा न करता सर्व गरबा रसिकानी रिमझिम पावसाच्या सरीत गरबा नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली.यावेळी प्रसिद्ध रीलस्टार बेरोडीच्या लंक्या यांनी आपल्या विनोदिअंदजात देवरीकरांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कवितात गायकवाड (उपविभागीय अधिकारी, देवरी) यांच्या हस्ते झाल असून अध्यक्षस्थानी संजय पुराम (आमदार, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र) हे होते. या सोहळ्यास विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती त्यात वीरेंद्र अंजनकर (संघटक प्रमुख भाजप गोंदिया/भंडारा ), प्रमोद संगीडवार, संजु उईके(नगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष भाजप देवरी), अनिलकुमारजी बिसेन(सभापती , पंचायत समिती देवरी), प्रज्ञाताई संगीडवार (उपाध्यक्ष, नगर पंचायत देवरी), पारस कट्कवार , उमेश काशीद प्रकल्प अधिकारी देवरी, महेश गणवीर (तहसीलदार, तहसील कार्यालय देवरी), प्रवीण डांगे (पोलीस निरीक्षक, पो.स्टे. देवरी), पिंकी कटकवार प्रामुख्याने उपस्थित होते.
देवीच्या आराधने समोर पाऊसही नमला
रिमझिम पावसाच्या सरी बरसत असतांना गरबा नृत्याच्या माध्यमातून देवीची आराधना आणि महिलांचा उत्साह बघून पाऊसही नमता झाला. पावसाच्या सरी अंगावर घेत स्पर्धकांनी नवरात्रीचा स्मरणदायक अनुभव घेतला. यावेळी प्रेक्षकांनी छत्रीचा आधार घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला.









