राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचा आठवडा संपन्न

देवरी : मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिनांक २२/०९/२०२५ ते २९/०९/२०२५ पर्यंत रासेयो स्थापना आठवडा संपन्नतेकडे वाटचाल करीत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका एस. व्ही. भुरे मॅडम यांची निवड करण्यात आली. दुसऱ्या दिवशी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी अखंड भारत राखण्यासाठी महत्वाचे योगदान दिले याविषयी मार्गदर्शन केले.
आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी २४/०९/२०२५ रोजी देवरी येथील मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनाचा सोहळा जी.एम.मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अतिथी गीता मुळे ( पोलीस अधीक्षक) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला, मान्यवरांच्या श्रुंखलेत उपमुख्याध्यापक एस.पी.देशमुख,प्राध्यापक, पी.आर.मनगटे, एस.व्ही.भुरे , जे.जी.खेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शिक्षण घेत असताना कोणतेही अनुचित कार्य करू नये, कायद्याच्या चौकटीत राहून सामाजिक सेवा करावी अशा आशयाचे भाषण माननीय गीता मुळे यांनी केले.तसेच सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांने शिक्षण घेवून राष्ट्रहित जोपासावे असे विचार व्यक्त करून देश समृद्ध करावा, अशा आशयाचे भाषण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य बडोले याने केले तर आभार वर्षा मेश्राम हिने मानले.हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी सर्व स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें