वीज कोसळल्याने म्हैसीचा जागीच मृत्यू

देवरी :- देवरी तालुक्यातील ग्राम शेडेपार येथे रात्रीला विजेसह जोरदार पावसामुळे काशिनाथ गुनेश्वर गायधने यांच्या म्हशीवर वीज पडल्याने म्हशीच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली
सविस्तर असे की आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीला साडेबारा ते एकच्या दरम्यान विजेच्या गडगडासहित जोरदार पाऊस आल्याने वीज म्हशीवर पडल्याने म्हशीच्या मृत्यू झाला त्याची माहिती सकाळी गायधने यांना कळल्या नंतर तलाठी, पोलीस पाटील व सरपंच यांना कळविण्यात आले, तसेच म्हशीचे अंदाजी रक्कम 70 ते 80 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे, सदर म्हशीचे पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें