शिवसेनेच्या 35 शिवसैनिकांनी रक्तदान करुण दिला जीवनदानाचा संदेश

प्रहार टाईम्स तालुका प्रतिनिधी

देवरी 8:

रक्तदान म्हणजे जीवनदान, रक्ताच्या तुटवड्यामुळे कित्येकांचे जीव गमवावे लागले त्यामुळे या रक्तदाच्या मोहिमेला उत्कृष्ट पद्धतीने राबवून देवरी तालुक्यातील चीचगड जिल्हा परिषद क्षेत्रातील पालांदूर शिवसेनेच्या शाखेच्या शिवसैनिकांनी स्वयं स्फूर्तीने रक्तदान करून जीवनदानाचा संदेश दिला.

ग्रामीण भागातील युवकांना एकत्रित करून त्यांच्या द्वारे उत्कृष्ट जनहितार्थ उपक्रम रावबून शिवसेनेने मानाचा तुरा रोवलेला आहे.


सदर रक्तदान शिबिरामध्ये 35 शिवसैनिकांनी रक्तदान केले असून या उपक्रमाचे आयोजक राजीक खान संघटन प्रमुख आमगाव देवरी विधानसभा , सुनील मिश्रा तालुका प्रमुख, राजा भाटिया शहर प्रमुख, अनिल कुर्वे तालुका शिक्षक सेना आणि पालांदूर शाखेचे शिवसैनिक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share