उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जमीनीचे आरोग्य महत्त्वाचे- कृषिविभाग देवरी

डॉ. सुजित टेटे


देवरी ७: तालुक्यात वर्षानुवर्षे भातशेती हा एकमेव पिकपध्दती रुढ झालेली आहे. त्यामुळे जमीनीचे आरोग्य धोक्यात आले असून त्यासाठी माती तपासणी करुन प्रत्येक शेतकार्यांना जमीन आरोग्य पत्रिका देन्यात येणार आहे. असे प्रतिपादन देवरीचे तालुका कृषिअधिकारी जी.जी.तोडसाम यांनी केले आहे.. आदिवासी, नक्षलग्रस्त दुर्गम भागातील धमदीटोला, आलेवाडा,गडेगाव या गावामध्ये जमीन आरोग्य पत्रिका जनजागृती कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिचगडचे मंडळ कृषिअधिकारी चंद्रकांत कोळी यानी जमीनीचे आरोग्य व सुपिकता या विषयावर व्याख्यान देऊन शेतकऱ्यांना माहीती दिली.

अलीकडच्या काळात कृषिविभागाच्या प्रयत्नाने खरीप आणि रब्बी उन्हाळी हंगामात मुख्य भातपिकाबरोबर ज्वारी तुर,हरभरा,करडई जवस,मोहरी ही पिके घेण्याबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे.. भात पिकावर परत भात घेण्यामुळे जमीन नापीक झालेली आहे. मातीमधील अन्नद्रव्यांची मोठ्याप्रमाणात उपसा होऊन सेंद्रियकर्ब अत्यंत कमी झाल्याने जमीन रासायनिक खताना प्रतिसाद देत नाही. पावसाळ्यात शेतकरी भातशेतीला युरीया सारखी खते वापरतात परंतु तात्पुरती हिरवीगार पिक दिसते.त्यामुळे खोडकीडा, रसशोषणारे मावा, तुडतुडे या हानिकारक कीडींचा प्रादुर्भाव होऊन हाताशी आलेले भातपिकाचे नुकसान होते व शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुध्दा पदरी येत नाही.त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झालेला आहे.म्हणून अधिक उत्पादनासाठी सुपिक माती आवश्यक आहे.

कृषिविद्यापीठातील संशोधनानुसार सुपिक माती म्हणजे ज्या मातीमध्ये– मातीचे कण- ४५% ,पाणी- २५% हवा -२५ % सेंद्रिय पदार्थ ५ % ,=१००%सुपिक जमीन होय. परंतु देवरी तालुक्यातील जमीनीमध्ये ५ टक्के सेंद्रिय पदार्थ नसल्याने पाणी आणि हवा या दोन्ही घटक ऐन दाणे भरताना अत्यंत कमी कमी होत जातात.त्यामुळे मातीचे कण हे अतिजवळ येऊन भाताच्या पांढऱ्या मुळी चिरडले जातात.पर्यायाने जमीनीतून अन्न पुरवठा बंद होतो आणि दाणे न भरल्यामुळे फोल भद्रा जास्त प्रमाणात होते व उत्पादन कमी येते.. गावाचे सुपिकता निर्देशांक तक्ता गावातील ग्रामपंचायत येथे लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिका जपून ठेवावे. तीन वर्षापर्यंत अहवालनुसार खतांचा वापर करावा. त्यामध्ये सहास्तरीय शिफारस असते. १)अत्यंत कमी २) कमी ३)मध्यम ४)साधारण ५) साधारण भरपूर ६)अति भरपूर असे अन्नद्रव्याचे निर्देशांक दिलेले आहे त्याप्रमाणे सेंद्रियशेती बरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावे असे कृषिविभागाकडून अवाहन करण्यात येत आहे.


जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिचगडचे कृषिपर्यवेक्षक जी.एस.पांडे,एच पी वाढई कृषिसहाय्यक एच झेड शहारे,कु.माया येरणे,कु.गौतम , गौरीशंकर कोरे ,हुडे,सचिन गावळ इत्यादी क्षेत्रिय अधिकारी कर्मचारी परिश्रम घेतले.

Share