
देवरी : देवरी पोलीस स्टेशन येथे देवरी पोलीस स्टेशन व सहयोग फाउंडेशन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यामाने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण करणारे मुलेमुली यांना साहित्य वाटप करण्यात आले.
मुले गोळा – 02 नग , मुली गोळा – 02 नग, स्टॉप वाच – 10 नग, कोन 9 इंच – 20 नग, लीडर 8 मीटर – 02 नग , हर्डल 9 इंच – 12 नग, रनिंग प्यारासूट – 10 नग साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमात सहयोग फाउंडेशनचे लोखंडे, काटकर, कुसुम मॅडम उपस्थिती होते. अध्यक्षस्थानी प्रवीण डांगे ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी उपस्थित होते. यावेळी उपस्थिती विध्यार्थीना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी व पोलीस भरती सरावाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.सदर कार्यक्रमात देवरी पोलीस स्टेशन चे अधिकारी अंमलदार व सहयोग फाउंडेशन चे सदस्य हजर होते. वरील कार्यक्रम SOP चे पालन करून घेण्यात आला.
गोंदिया जिल्हा पोलीस दल “दादालोरा खिडकी ” योजने अंतर्गत गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया, अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक कॅम्प देवरी यांचे संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, प्रवीण डांगे ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले.









