तान्हापोळा उत्सव स्पर्धा चांगोटोला(हौसीटोला)
गोरेगाव : तालुक्यातील चांगोटोला गावात यावर्षीही शेतकऱ्यांच्या परंपरेचा व लहान चिमुकल्यांचा तान्हापोळा उत्सव स्पर्धा भव्य स्वरूपात पार पडला. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम सरपंच श्यामकुमार माधोराव फाये यांच्या पुढाकारातून हनुमान मंदिर च्या परिसरात आयोजित करण्यात आला. सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते.
गाव व परिसरातील चिमुकल्यांनी सजवलेल्या नंदी बैलांसह स्वतः शेतकरी वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे विजेते व पारितोषिक रक्कम व विजेता चिमुकल्या बाल गोपाळांचे सत्कार करण्यात आले. पुढीलप्रमाणे –
• प्रथम क्रमांक – आर्यन सुनील फाये (७०१/-₹)(श्यामकुमार माधोराव फाये सरपंच यांच्या कडून)
• द्वितीय क्रमांक – धार्स सुजित फाये (५०१/-₹)(चौकलाल केशवराव येळे त. मु स.अध्यक्ष.यांच्या कडून)
• तृतीय क्रमांक – दृही हितेंद्र बिसेन (३०१/-₹)(टुमेश येळे मा.उपसरपंच यांच्या कडून)
• विशेष पारितोषिक –
सर्व सहभागी तान्हा पोळा बाल गोपाल स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून १५०/- ₹ देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी निर्णायक मंडळात राजेंद्र येळे (पो.पा), पुरणलाल नागोसे (ग्रा.प.सदस्य) देवेंद्र पटले (ग्रा.प.सदस्य) गुप्तानंद लांजेवार (शा.व्य.स. अध्यक्ष) अशोक नागोसे (मा. सरपंच)
योगराज पटले (मा. उपसरपंच) गीताबाई येळे (मा. उपसरपंच)
रामकृष्णजी कटरे उमेस्वर सेऊत योगराज येळे, सुनील येळे, संदीप बिसेन, नामदेवनाईक, प्रेमलाल लांजेवार ग्रा. प.परिचर
यांचा सहभाग होता. तसेच ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ग्रामपंचायत हौसीटोला चा हा उपक्रम परंपरा, संस्कृती आणि शेतकरी सन्मान यांचा संगम घडवणारा ठरून संपूर्ण तालुक्यासाठी आदर्श ठरला आहे. कार्यक्रमाचे संचालन योगराजजी पटले यानी केले यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .









