◼️ग्राम पंचायत सुरतोली येथील गावकऱ्याची मागणी
देवरी: तालुक्यातील ग्रामपंचायत सुरतोली येथे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर ठाम भूमिका घेतली आहे. ग्रामपंचायतीकडे असलेल्या सामान्य निधीचा व पंधराव्या वित्त आयोगांतर्गत आलेल्या निधीचा संपूर्ण लेखाजोखा गावकऱ्यांसमोर मांडण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे समस्त गावकऱ्यांनी २५/०१/२०२५ ला ग्रामपंचायत सुरतोली , जिल्हा परिषद गोंदिया , पंचायत समिती देवरी यांना सामूहिक निवेदन सादर केले होते परंतु ७ महिने उलटूनही ग्रामपंचायत सुरतोली येथील सरपंच आणि सचिव यांनी जमा खर्चाचर विवरण सादर न केल्याने पुन्हा एकदा २३ ऑगस्ट ला सामुहिक अर्ज केला आहे.

सादर अर्जमध्ये विशेषतः सन-२०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या वित्तीय वर्षात केलेल्या नियोजन व खर्च केलेले नियोजन दोन्ही बाजु ग्रामसभेत सादर करण्यात यावे. सोबतच १५ वित्त शासकिय परिपत्रकाचे ग्रामसभेत सादर करण्यात यावे. खालील दर्षविलेले सर्व दस्तावेज विशेष ग्रामसभेत दाखविण्यात यावे. सामान्य फंड बँकेची पासबुक सन-२०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ चे विवरण देण्यात यावे. १५ व्या वित्त अंतर्गत बँकेची पासबुक सन-२०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षीचे नियोजन शासकिय परिपत्रकानुसार वास्तवीक केलेल्या कामाची सूची देण्यात यावी. अशी मागणी केली होती. परंतु सरपंचांनी कुठलीही माहिती न दिल्यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाकडून येणारा निधी हा ग्रामविकासासाठी व पारदर्शकतेसाठी वापरला गेला पाहिजे. मात्र, निधीच्या खर्चाविषयी ग्रामसभेत स्पष्ट माहिती दिली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून सर्व उत्पन्न-खर्चाचा तपशील, कामांची यादी व हिशेबपत्रक ग्रामसभेत उघडपणे मांडण्यात यावे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. गावकऱ्यांनी इशारा दिला आहे की जर लेखाजोखा पारदर्शकपणे मांडला गेला नाही, तर पुढील ग्रामसभेत तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप परिहार यांनी दिली.
यावेळी सुरतोलीचे सरपंच यांना माहिती विचारले असता येणाऱ्या अर्धवार्षिक सभेत लेखा जोखा हिशोब सादर करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सरपंच कैलास मरसकोल्हे यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे अर्ध वार्षिक सभा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात घेतली जाते परंतु ऑक्टोबर महिन्यात निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याची शक्यता असून आचारसहींतेत जमा खर्च आणि हिशोबाची माहिती सरपंच कशी सादर करणार असा प्रश्नचिन्ह ? निर्माण झाला आहे.









