रील बनवा अन् १ लाख जिंका! महाराष्ट्र सरकारची विशेष स्पर्धा

प्रहार टाईम्स : महाराष्ट्राच्या विधानसभेत गणेशउत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला. या निर्णयाचे राज्यभरात गणेशमंडळांनी स्वागत केलं आहे. यासोबतच राज्य सरकारने गणेशउत्सवाच्या अनुषंगाने गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन केलं आहे. या स्पर्धेत आता आणखी एका स्पर्धेची जोरदार चर्चा होत आहे.

यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करायचे आहेत.

कोणत्या विषयावर रील असावेत ?

रीलसाठी विविध विषय आखून दिले आहेत. या विषयांमध्ये पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर ही थीम असावी, असं सांगण्यात आलं आहे. या थीमवर ३० सेकंद ते ६० सेकंदापर्यंत रील बनविणे अपेक्षित आहे. ही स्पर्धा महसूल विभागीय स्तर, राज्यस्तर आणि महाराष्ट्रबाहेर व भारताबाहेरील खुला गट अशा तीन गटात होणार आहे.

बक्षिसांचे स्वरुप 

महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक म्हणून २५ हजार रुपये मिळणार आहे. द्वितीय पारितोषिक रुपये १५ हजारांचे असणार आहे. तर तृतीय पारितोषिक १० हजारांचे असेल. याशिवाय उतेजनार्थ विजेत्यास ५ हजार अशा स्वरुपात पारितोषिक दिले जाईल.

राज्यस्तर 

या स्पर्धेसाठी राज्य स्तरावरील प्रथम विजेत्याला १ लाख रुपये द्वितीय पारितोषिक ७५ हजारांचे दिले जाणार आहे. तर तृतीय पारितोषिक ५० हजार रुपयांचे असणार आहे. यात पुन्हा उतेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. २५ हजार रोख रक्कम असणार आहे.

महाराष्ट्र व भारताबाहेरील

महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये, उतेजनार्थ म्हणून २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

नोंदणी कशी करायची?

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणीसाठी गुगल फॅार्म तयार करण्यात आला आहे. filmcitymumbai.org या संकेतस्थळावरून नोंदणी करता येईल. किंवा मग महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे, असं दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून कळविण्यात आलं आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें