देवरी शहरात अजगरांचे वास्तव्य, प्रशासनाने खबरदारीचे उपाययोजना करावे

देवरी :गेल्या काही दिवसांपासून देवरी शहर व परिसरात मोठ्या अजगरांचे वास्तव्य आढळून येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. त्रिमूर्ती नगर, आमगाव रोड, न्यायालयाचे परिसर तसेच काही घरांच्या मागील भागात हे अजगर वारंवार दिसत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निसर्ग संरक्षणाच्या दृष्टीने अजगर हा महत्त्वाचा प्राणी असला तरी तो अनवधानाने घराजवळ किंवा मोकळ्या जागेत दिसल्यास धोका संभवतो. विशेषतः लहान मुले व पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

या संदर्भात वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने खबरदारीचे उपाययोजना कराव्या, शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देवून योग्य कार्यवाही करावी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी स्वतःहून अजगर पकडण्याचा किंवा हाकलण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासनाने गावात जागृती मोहीम राबवून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें