देवरीचा राजाच्या स्वागतासाठी मंडळाची धामधूम

देवरी: गणेशोत्सव १ दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरांसह ग्रामीण भागातील मंडळांकडून तयारीला वेग देण्यात येत असून, बाजारपेठेतही रेलचेल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. २७ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळांसह घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवरीचा राजाच्या मंडप सजावटीला वेग आला असून, या वर्षी विविध सामाजिक संदेशांवर आधारित देखावे उभारले जात आहेत. रंगीबेरंगी लाइट्स, आकर्षक शिल्पे आणि साजशृंगारामुळे मंडप परिसर उजळून निघत आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सजावटीसाठी रात्रंदिवस मेहनत सुरू केली आहे. बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. मूर्ती, सजावटीचे साहित्य, फुले, आरास साहित्य, पारंपरिक वेशभूषा आदी वस्तू खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. गणेशोत्सव हा भक्ती, उत्साह व ऐक्याचे प्रतीक असून,

मूर्तिकारांनी हाताला वेग दिला आहे. काळानुरूप गणेशमूर्तीचे रूप, ट्रेंड बदलत आहे. शाडू, पीओपीच्या मूर्तीमध्ये अधिक जिवंतपणा आणण्यासाठी मूर्तिकार कापडी वस्त्रांचे पितांबर, शेला, फेटा साज करत आहेत. नवनव्या प्रकारच्या, कपड्यांच्या, काठपदराच्या पितांबर शैलीने या सजावट केलेल्या मूर्तीना भक्तांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें