ओवारा येथे तान्हा पोळाचे थाटात आयोजन

■आमदार संजय पुराम व माजी आमदार कोरोटे यांची उपस्थिती

देवरी: लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरूपण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी तान्हा पोळा’ साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा आयोजन ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या अनुसंघाने देवरी तालुक्यातील ओवारा (प्रथम प्रवेश द्वार जवळ) लाकडी बैलाचा तान्हा पोळाचे आयोजन रविवार (ता.२४ आगस्ट)रोजी दुपारी करण्यात आले होते. अशाप्रकारे तान्हा पोळाचा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या तान्हा पोळाचे उद्घाटन या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते आणि या क्षेत्राचे माजी आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या वेळी सर्वप्रथम लाकडी नंदी बैलांच्या पोळा स्थळी दीप प्रज्वलन करूण कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी ओवारा चे सरपंच उमेश येरणे, माजी सरपंच कमल येरणे, हिरामन टेकाम, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष खोमेन्द्र बिसेन, माजी अध्यक्ष देवेन्द्र डोये,शिवसेनेचे आमगाव- देवरी विधान सभा समन्वयक बळीराम कोटवार , शिवसेनेचे देवरी तालुका प्रमुख जयपाल प्रधान, शेतकरी श्रीराम लांजेवार, मोतीराम मेहर, भाऊदास बिजलेकर, खुमराज टेटे यांच्यासह ओवारा ग्रामपंचायत चे सर्व सदस्य,शेतकरी, महिला मंडळी, बालगोपाल मोठ्या संख्येत कार्यक्रमाला उपस्थित होते.
दरम्यान सर्व लाकडी नंदी बैलाचे निरीक्षण करूण उत्कृष्ट नदी बैलाची निवड करूण प्रथम पुरस्कार जर्मन गंज सरपंच उमेश येरणे यांचे कडून तर द्वितीय पुरस्कार चांदिची गोप देवरीचे प्रमोद रोकडे यांच्याकडून आणि तृतीय पुरस्कार टेबल पंखा देवरीचे प्राचार्य डॉ. सुजीत टेटे यांच्या कडून व चतुर्थ पुरस्कार इलेक्ट्रीक प्रेस ओवाराचे मोतीराम मेहर यांच्या कडून तसेच पांचवा पुरस्कार दिवाल घडी ओवाराचे विजय खरडे यांच्या कडून आणि नंदी बैल घेवून सहभाग घेतलेल्या सर्व बाल गोपालांना समिती तर्फे प्रोत्साहनपर पुरस्कार वाटप प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार सहषराम कोरोटे व आमदार संजय पुराम यांनी उपस्थित सर्व बालगोपालांना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
अशा प्रकारे तान्हा पोळाचा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.#

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें