लोकप्रतिनीच्या लॉलिपोप ने नागरिक बेहाल, बस सेवेसाठी गाठले परिवहन मंडळ
देवरी : स्वातंत्र्याचे ७८ वर्षे लोटूनही देवरी तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक गावे बस ची आतुरतेने प्रतिक्षा करीत आहेत. यामधे ग्रामपंचायत म्हैसुली अंतर्गत महाजनटोला, बिचटोला, मडावीटोला, (म्हैसुली) या गावातील लोकांनी लोकप्रतिनिधीच्या फोल ठरलेल्या आश्वासांना दूर ठेवीत चक्क राज्य परिवहन मंडळाला साकळे घातले आहे. या गावातील एकुण लोकसंख्या 732 असुन ह्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता त्याचप्रमाणे गावकरी लोकांना शासकीय कामा करीता जाण्या येण्याकरीता, वैद्यकीय उपचाराकरिता बस सुविधा उपलब्ध नाही. यामुळे असह्य अडचणी निर्माण झाल्या असून एकी कडे अमृत महोत्सव साजरा होत असतांना प्राथमिक सोयीसुविधे साठी त्रास सहन करावा लागत आहे.
निवेदनातील माहिती नुसार तालुक्याचे ठिकाण असलेले देवरी वरुन देवरी, चिचगड ते म्हैसुली मार्ग बस सुविधा सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 व सांयकाळी 5.00 वाजे पर्यंतची बस सरु करण्यात यावी यासाठी अनेकदा निवेदन व प्रतिवेदन ग्रामस्थाकडुन सादर करण्यात आले व सर्वे सुध्दा करण्यात आला परंतु म्हैसुली येथील आदिवासी गोरगरीब जनतेचा आता पर्यंत विचार करण्यात आला नाही. 2023-2024 मध्ये बस सेवा ची सर्वे करण्यात आले होते. (मरामजोब, मासुलकसा, मंगेझरी, म्हैसुली ते म्हैसुली फाटा बस स्टॉप) पर्यंत सर्वे कण्यात आले होते. परंतू यांच्या नशिबी बस सुविधा नसल्याने पुन्हा एकदा ग्रामस्थानी मागणी केली आहे. यामधे जगन सलामे, राजकुमार सलामे, माणिक कोरेटी, विजय धुर्वे, बाबुलाल सलामे, जगत नुरेटी, हेमराज सलामे, अनिल कोरेटी, स्वप्नील कोल्हारे, ईश्वर कोल्हारे यांनी निवेदन सादर केले आहे.









