
देवरी २२: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे पोळा सणाच्या पर्वावर तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी संस्कृती, शेतकरी आणि शेती याविषयी माहिती विदयार्थ्यांना असावी, मराठी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने पोळाच्या पर्वावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मोनीत रोकडे ज्वेलर्सचे संचालक प्रमोद रोकडे, बँक निरीक्षक मुकेश डुंभरे, संदीप मोहबिया , प्राचार्य डॉ. सुजित टेटे उपस्थित होते.यावेळी नंदी बैलांचे पूजन करून मराठी गौरव गीत सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमात प्ले ग्रुप , नर्सरी , केजी व इयत्ता १ली २ री चे विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषेत आणि आकर्षक नंदी बैल घेऊन सहभागी झाले होते. शाळेतील उत्साही विद्यार्थी मराठी वेशभूषेत शाळेत हजर होते. मराठमोळ्या अंदाजात नृत्य सादर करून सर्वांचा स्वागत केला. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ वितरण करण्यात आले.
तान्हा पोळा कार्यक्रमात विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव झाला असून प्रथम पुरस्कार रोकडे ज्वेलर्सचे संचालक प्रमोद रोकडे यांचे कडून १२ ग्रॅम चांदीचे गोफ, द्वितीय बक्षीस मुकेश डुंभरे यांचे कडून आकर्षक भेट वस्तू , तृतीय बक्षीस प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांचे कडून, ३ उत्कृष्ट सहभागी स्पर्धकांना रोख बक्षीस देण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि पेन्सिल देण्यात आल्या. यामध्ये प्रथम क्रमांक विहान कैलास टेंभरे , द्वितीय वीरांश अमृतकर, तृतीय अतिक्ष बिसेन उत्कृष्ट सहभाग सायली टेटे, देवांश सूर्यवंशी , कृष्णवी दुबे आणि रियांश मोर यांनी मिळविला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नलू टेंभरे , तनुजा भेलावे यांनी केले असून आभार प्रदर्शन मोहसीना खान यांनी मानला.









