देवरी तालुक्यातील १२ ईसमांना केले देवरी तालुक्यातून हद्दपार !

देवरी : सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायदा राखण्यासाठी दिनांक-२२/०८/२०२५ व दिनांक-२३/०८/२०२५ रोजी संपन्न होणाऱ्या पोळा, तान्हा पोळा (मारबत) उत्सव साजरा करण्यात येत असल्याने या कालावधीत कायदा व सुव्यवस्था दुष्टीने १२ ईसमाविरूध्द भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम-१६३ (२) अन्वये प्रस्ताव तयार करून अभय डोंगरे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, यांना सादर केले असता सदर इसमांना दिनांक २२/०८/२०२५ व दिनांक-२३/०८/२०२५ रोजी पर्यंत देवरी तालुक्यातुन २ दिवसाकरीता हददपार करण्याचे आदेश दिले आहे.

ईसम नामे १) कॅप्टन महेन्द्रपालसिंग भाटीया वय. ३२ वर्षे रा-वार्ड क्र.७ देवरी, ता-देवरी जि. गोंदिया, २) राजु गंगाराम पदिरे वय-५८ वर्ष रा-डोंगरगाव डेपो ता-सडक/अर्जुनी, जि. गोंदिया. ३) अजय सुधाकर ठोंबरे वय-४५ वर्ष रा-मरामजोब ता-देवरी, जि. गोंदिया. ४) विशाल कैलाश राऊत वय-२३ रा-वार्ड क्र.१७ परसटोला देवरी, ता-देवरी, जि. गोंदिया. ५) सुरेंद्रसिंह देवेद्रसिंह देसाई वय. ४८ वर्षे रा. सुरतोली ता-देवरी, जि. गोंदिया. ६) रामनाथ बाळु येले वय ४२ वर्ष रा-वार्ड क्र.१२ देवरी, ता-देवरी, जि. गोंदिया. ७) दिलीप विश्वनाथ बोरकर वय-५० वर्ष रा-डोंगरगाव / डेपो, ता.सडक/अर्जुनी, जि.गोंदिया. ८) कुवर सोनु गहाणे वय. ५० वर्षे रा. डोंगरगाव / डेपो, ता. सडक / अर्जुनी, जि. गोंदिया. ९) रविद्र चंभरु मडावी वय. ३१ वर्षे रा. खुर्शीपार, ता. सडक/अर्जुनी, जि. गोंदिया. १०) राजेश नामदेव राऊत वय-४५ वर्ष रा-बाम्हणी ता.सडक/अर्जुनी जि. गोंदिया. ११) खुशाल कैलाश राऊत वय-२१ रा-वार्ड क्र.१७परसटोला देवरी, ता-देवरी, जि. गोंदिया. यांना दिनांक-२२/०८/२०२५ व दिनांक २३/०८/२०२५ रोजी पर्यंत देवरी तालुक्यातुन २ दिवसाकरीता हददीत हजर राहु नये असे आदेश पारीत केले आहे.

पो. नि. प्रविण डांगे सा. यांचे मार्गदर्शणाखाली सदर कारवाई करीता पो.हवा. धर्मराज कटरे/१५०८, मपोशि निता कांबळे/२२७२ पोलीस स्टेशन देवरी, यांनी निर्गती केली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें