देवरी : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक गोरख भामरे गोंदिया यांचे सुचनेप्रमाणे अभय डोंगरे अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी., उपविभाग देवरी, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रविण डांगे पोलीस स्टेशन देवरी यांनी ‘स्वतः सहभाग घेवुन दिनांक १९/०८/२०२५ ते दि. २१/०८/२०२५ पर्यंत पोलीस स्टेशन व उपमुख्यालय देवरी येथील आवारातील साफसफाई करुन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सव्छता मोहीमेमध्ये पोलीस स्टेशन देवरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार, उपमुख्यालय देवरी येथील अधिकारी व अंमलदार तसेच अपर पोलीस अधिक्षक कार्यालय देवरी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देवरी येथिल पो. अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला.








