प्लस पोलीओ डोज ऐवजी सेनिटायझर चे डोज पाजले !! १२ चिमुकले रुग्नालयात दाखल
भंडारा अग्नि तांडव घटना ताजी असतांना राज्यात चिमकल्याच्या आरोग्यबाबत हलगर्जीपणा
प्रहार टाईम्स
घाटंजी ०१ : तालुक्यातील भांबोरा आरोग्य केंद्र येथील घटना पोलिओ लसीकरणादरम्यान येथील आरोग्य केंद्रात बारा बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बारा बालकांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दो बुंद जिंदगीके असा नारा देत राज्यात पोलिओ लसीकरणाची मोहीम राबवली जाते. मात्र पोलिओ लसीएवजी सॅनीटायझर बालकांना पाजल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
१२ चिमुकले रुग्नालयात दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली असुन जिल्हाधिकारी एम .देवेंदर सिंग यांनी चौकशी चे आदेश दिले.
घाटंजी तालुक्यातील भांबोरा आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुरुवातीला या बालकांना मळमळ व उलट्या होवू लागल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती खरा प्रकार उघडकीस आला. या घटनेबद्दल बालकांच्या पालकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची चौकशी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहे.
कापसी हे गाव घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येते . गिरीश किसन गेडाम , योगीश्री किसन गेडाम , अंश पुरुषोत्तम मेश्राम , हर्ष पुरुषोत्तम मेश्राम , भावना बापूराव आरके , वेदांत नितेश मेश्राम , राधिका नितेश मेश्राम , प्राची सुधाकर मेश्राम , तनुज राम गेडाम , निशा प्रकाश मेश्राम व आस्था प्रकाश मेश्राम अशी सॅनिटायझर पाजण्यात आलेल्या बालकांची नावे आहेत . त्यांना यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले आहे . कुणाकडून चूक झाली याचा तपास सुरू संपूर्ण प्रकार गंभीर असून , यात कोणाकडून चूक झाली याची चौकशी सुरू आहे . ज्यावेळी मुलांना लस देण्यात आली , त्यावेळी लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी , आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजर होते . तिघांपैकी कुणाकडून ही चूक झाली याचा तपास सुरू आहे तसेच पोलिओ बूथ वर अनेक कर्मचारी असतात परंतु हा प्रकार लक्षात का आला नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.