
आ.संजय पुराम यांनी घेतली अरकरा कुटुंबीयांची सांत्वना भेट
15 हजार रु च्या मदतीसह शासकीय मदत त्वरित देण्याचे आश्वासन
देवरी: ककोडी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तुमडिकसा येथे दिनांक 10 जून 2025 रोज मंगळवार ला दुपारी चार वाजे दरम्यान घरावरून जाणाऱ्या विजेच्या तारेच्या घर्शनाने लागलेल्या आगीत चार भावांचे अरकरा कुटुंबांचे घर राख झाले.आगीमुळे झालेले नुकसान सहन न झाल्याने दुसऱ्या दिवशी अरकरा बांधवांच्या आई कुंतीबाई अरकरा यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले होते.अरकरा कुटुंबावर ओढावलेल्या दुहेरी संकटाची बातमी कळताच मुंबई वरून परत येताना आ.संजय पुराम यांनी दि.13 रोजी तुंमडीकसा येथील अरकरा परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. व पंधरा हजार रुपयाची मदत त्वरित करून शासकीय योजनेचा त्वरित लाभ देण्याचे आश्वासन दिले. क्षेत्राचे आ.संजय पुराम यांनी दि.13 रोज शुक्रवारला तूमडीकसा येथे जाऊन अरकरा कुटुंबियाची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.विनोद लथकोर अरकरा याला 15 हजार रु दिले.तसेच देवरी तहसीलदार यांना अरकरा कुटुंबीयांना धान्य त्वरित देण्याचे आदेश दिले.तसेच पंचनामा तयार करून शासकीय मदत त्वरित देण्याचे सांगितले. व महावितरण चे कार्यकारी अभियंता यांनाही महावितरण कडून मदत त्वरित देण्याच्या सूचना केल्या.अरकरा कुटुंबीयांना वेळोवेळी मदत देण्याचे आश्वासन आ. पुराम यांनी दिले.यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष संजू उईके, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजय कश्यप, ककोडी येथील सामाजिक कार्यकर्ते मनेंद्र मोहबंसी हे उपस्थित होते.