
संस्कृती, आरोग्य आणि कलेच्या माध्यमातून स्वतःचा ठसा उमटवा :- आ. संजय पुराम
“अ” क्राझ डान्स अकॅडमी तसेच झुंबा फिटनेस एज्युकेशन तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार सोहळा संपन्न
देवरी: शहराअंतर्गत पंचशील चौकातील समाज मंदिर मध्ये “अ” क्रॉझ डान्स अकॅडमी तसेच झुंबा फिटनेस एज्युकेशन तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी आपल्या देवरी तालुक्यातील कलावंताच्या आणि नव उदयनमुख प्रतिभांचा सन्मान केला आहे. याचा मला अतिशय अभिमान वाटतो. युवकांच्या कलात्मक आणि बौद्धिक विकासासाठी आपण राजकीय पातळीवर कला, क्रीडा आणि फिटनेस क्षेत्राला अधिकाधिक प्रोत्साहन देणार आहोत. कारण आजचा युवा, तो केवळ स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीच्या मागे धावत नाही तर, आपल्या संस्कृती, आरोग्य आणि कलेच्या माध्यमातूनही स्वतःचा ठसा उमटवत आहे. असे कार्यक्रमाला उपस्थितांसमोर समोर मोलाचे मार्गदर्शन केले आहे. यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पदक विजेता खेळाडू, दहावी तसेच बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच लोकशाहीला जिवंत ठेवणाऱ्या तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सत्कार केला. या सत्कारांमध्ये साप्ताहिक तांदूळनगरीचे अग्रेसर पत्रकार संदेश मेश्राम यांचा उत्तम पत्रकार म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच विविध वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींचा त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक संजय उईके नगराध्यक्ष देवरी, सविताताई पुराम माजी सभापती जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, अनिल बिसेन सभापती पंचायत समिती देवरी, अनुभाई शेख बांधकाम सभापती नगरपंचायत देवरी, प्रमुख अतिथीत प्रज्ञाताई संगीडवार उपाध्यक्ष नगरपंचायत देवरी, कल्पनाताई वालोदे जि प सदस्य गोंदिया, संजय दरवडे, सीताबाई रंगारी, रमेश ताराम, संदीप तिडके सर, सरबजीत सिंग भाटिया, कौशल्याताई कुंभरे, इतर मान्यवर उपस्थित होते. विशेष अतिथी च्या रूपात मोनाली शहारे युट्युब रील स्टार, प्रतीक भैसारे कोरिओग्राफर, रितेश भैसारे डान्सर हजर होते. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आशिष ठाकरे त्याचप्रमाणे संयोजक बजरंग ग्रुप देवरी, हेल्पिंग बॉईज ग्रुप देवरी, जय श्री महाकाल ग्रुप देवरी, जय श्रीराम ग्रुप देवरी, तसेच इतर, तर विशेष संयोजक आफताब डेकोरेशन देवरी, पिंटू डीजे साउंड सर्विस देवरी, ऐश्वर्या गरमेंट देवरी तसेच इतर होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मोहूरले यांनी केले.