
ब्लॉसम स्कूलच्या शिक्षकांनी वनमजूरांसह श्रमदान करून साजरा केला जागतिक पर्यावरण दिन
◼️जागतिक पर्यावरण दिनाप्रसंगी ब्लॉसम स्कुलच्या शिक्षकांनी केले रोपवाटिकेत श्रमदान
देवरी : जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल येथिल शिक्षकांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या देवरी येथील रोपवाटिकेत वनमजूरांसह श्रमदान आणि वृक्षारोपण साजरा केला.
शाळापूर्व तयारी अंतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या तयारी करत असतांना शाळेतील सर्व शिक्षकांनी प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेला भेट दिली. यावेळी रोपवाटिकेत वर्षभर वृक्षाची आणि रोपट्यांची काळजी घेणाऱ्या वनमजूरांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी वनविभागाचे वनकर्मचारी फाटकर यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमात यशासाठी शिक्षक नामदेव अंबादे , भोजराज तुरकर , सरिता थोटे , वैशाली मोहुर्ले , नितेश लाडे , विश्वप्रित निकोडे , तनुजा भेलावे , राहुल मोहुर्ले, संगीता काळे आदी शिक्षणाने सहकार्य केले.