नरेंद्राचार्य महाराज संस्थान कडून देवरी ग्रामीण रूग्णालयास रुग्णवाहिका भेट

देवरी :- कोणत्याही समाजाचा किंवा धर्माचा अपघातग्रस्त रुग्ण हा पैशाअभावी तडफडत राहू नये यासाठी श्री क्षेत्र नाणीजधाम रत्नागिरी येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान कडून सामाजिक उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील ५२ शासकीय रुग्णालयांना रुग्णांना मोफत नेण्यासाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आल्या आहेत.
याचाच एक भाग म्हणून देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिलेल्या ५३ वी मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा गुरूवार /ता.०१ जून) रोजघ देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली आणि या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन केले आहे.
यावेळी नगराध्यक्ष संजू उईके, जि. प. माजी सभापती सविताताई पुराम,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रविण दहीकर, अनिलकुमार येरणे, माजी नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गगन गुप्ता, पूर्व विदर्भ पिठ प्रमुख राजेंद्र भोयर, सहपिठ प्रमुख सुरेश लाखे, व्यवस्थापक प्रविण परब, रुग्णवाहिका प्रमुख जगदीश फलक, महिला निरीक्षक वैशाली चतुर, जिल्हा निरीक्षक नवरंग मेश्राम, जिल्हाध्यक्ष मुलचंद खांडवाये, तालुकाध्यक्ष पार्थीव राऊत, शंकर रहांगडाले, राधेश्याम देशमुख, प्रल्हाद कुंभरे, रामदास सुरका, तेजस्वी आचले, तारा राऊत, श्यामकला देशमुख, चंद्रकला भोयर आणि शेकडो भाविक उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गावर कुठेही आणि कुणाचाही अपघात झाल्यास, सर्व नागरिकांनी धर्मभेद विसरुन या मोफत असलेल्या रुग्णवाहिकेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयपाल खांडवे यांनी तर प्रस्ताविक जगदीश फलक यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रकाश कोरे यांनी मानले.
कार्यक्रमाला आठ तालुक्याचे तालुकाध्यक्ष आणि सर्व गुरुबंधू गुरूभगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Share