
गोंदिया जिल्ह्यातील पोलिस अधिकार्यांच्या बदल्या
गोंदिया: महाराष्ट्र पोलिस विभागाने २७ मे रोजी काढलेल्या पत्रकान्वये पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांचे स्थानांतरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील २ पोलिस निरीक्षक व ७ पोलिस उपनिरीक्षकांचे स्थानांतर झाले आहे. तर ६ पोलिस उपनिरीक्षकांना एका वर्षासाठी गोंदिया जिल्ह्यातच मुदतवाढ मिळाली आहे.
गोरेगावचे ठाणेदार अजय भुसारी यांचे वर्धा येथे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांचे चंद्रपूर, पोलिस उपनिरीक्षक माणिक गुट्टे यांचे नागपूर परिक्षेत्र, रंजीत मट्टामी यांचे मसुप, शरद शैदाने यांचे अमरावती परिक्षेत्र, आकाश सरोदे यांचे नांदेड परिक्षेत्र, अशोक खेडकर यांचे नाशिक परिक्षेत्र, प्रियंका देसाई यांची कोकण परिक्षेत्रात तर रामेश्वर ढाकणे यांचे मसुप येथे स्थानांतर झाले आहे. नागपूर शहर येथून पोलिस निरीक्षक रवी नागोसे, गडचिरोली येथून रेवचंद सिंगनजुडे व पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथील रामदास सेवते यांचे गोंदियात स्थानांतर झाले आहे. एलसीबीतील पोलिस उपनिरीक्षक विनात रायकर, नक्षल विरोधी अभियानाचे श्रीकांत हत्तीमारे, सुखदेव राऊत, संतोष गुट्टे, प्रीतमकुमार येरमे व सपना सिडाम यांना वर्षभराची मुदतवाढ गोंदिया जिल्ह्यातच देण्यात आली आहे.