राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्य भा.ज.प.देवरी तालुका तर्फे विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
देवरी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त देवरी तालुका भा.ज.प. व आमदार संजय पुराम यांच्या वतीने देवरी नगर पंचायत अंतर्गत येत असलेले शासकीय व निमशासकीय शाळा येथील 2024-2025 सत्रातील वर्ग 10 वी व 12 वर्गातील उत्तीर्ण प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आफताब मंगल कार्यालयात संपन्न झाला.
या कार्यक्रमात तालुक्यातील १० व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात आणि सोशल मीडियावर जनजागृती करणाऱ्याना पुरस्कार स्वरूप सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले,
या कार्यक्रमा प्रसंगी आमदार संजय पुराएम , नगर पंचायत देवरी चे नगराध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष संजू शेषलाल उईके, सभापती अनिल बिसेन, सविता पुराम , उपाध्यक्ष प्रज्ञाताई प्रमोद संगीडवार, सभापती संजय रतीराम दरवडे, सभापती सिता प्रकाश रंगारी, सभापती, कौशल्याबाई नारायण कुंभरे, नगरसेविका, तनुजा दिनेश भेलावे,कमल मेश्राम, पिंकी पारस कटकवार, नगरसेवक, रितेश अग्रवाल, यादोराव पंचमवार यांच्या सह भाजप चे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संजय पुराम यांनी कुठल्याही गरजू विद्यार्थ्याला आर्थिक अडचण भासू देणार नाही अशी ग्वाही दिली.
सदर कार्यक्रमाला मूर्तरूप देण्यासाठी जिप सदस्य कल्पना वालोदे, प्रवीण दहीकर , तनुजा भेलावे, पिंकी कटकवार , श्री. भेंडारकर यांनी मोलाची भूमिका बजावली.









