देवरी:आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरु असलेले एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल बोरगाव बाजार ता. देवरी
जि. गोंदिया या शाळेतील शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेमध्ये रिक्त असलेल्या जागांचे अनुशेष भरुन काढण्यासाठी दि.०८ जुन, २०२५ रविवार रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत प्रवेश पुर्व परीक्षाचे आयोजन करण्यात येत असून प्रवेशौत्सुक अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून दि.०५ जुन २०२५ पर्यत खालील कागदपत्रासह शाळेच्या पत्यावर आवेदन अर्ज मागविण्यात येत आहे.
या प्रवेश पुर्व परीक्षा करीता लागणारे दस्त ऐवज विहित नमुन्यातील आवेदन अर्ज, जातीचा दाखला, विद्यार्थ्याचे व पालकांचे आधार कार्ड, उत्पन्न (कमाल मर्यादा ६ लक्ष), इयत्ता १० वीची गुणपत्रीका,
अपंगत्वाचा दाखला (लागु असल्यास),रहिवासी प्रमाणपत्र,फोटो आदि लागणार आहे.
या प्रवेश पुर्व परीक्षा खालील प्रमाणे आयोजित केली जाईल तसेच सर्व प्रश्न इयत्ता ९ व १० च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
अधिक माहितीसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल बोरगाव बाजार ता. देवरी जि. गोंदिया शाळेत कार्यालयीन वेळेत येऊन भेटावे किंवा मो.क्रं.७४९९६३८२५३ (Email-eklavyaborgaon@gmail.com) यावर संपर्क करावे. सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणा-या अर्जानुसार विद्यार्थ्याची लेखी परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार निवड केली जाईल. असे एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल बोरगाव बाजार येथील प्राचार्य गणेश तोडकर यांनी कळवीले आहे.









