उन्हाळी सराव शिबिरातील मुलांची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व पोलीस मुख्यालयाला भेट

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक व शारीरिक विकास उन्हाळी शिबिराचे आयोजन 1 ते 31 मे या कालावधीत जवळील बोरगाव येथील आश्रमशाळेत करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये ॲथलेटिक्स, संगीत, गोंडी-चित्रकला, क्ले-आर्ट, बांबू- आर्ट, मेहंदी, रांगोळी, नाशिक ढोल, आर्चरी व योगा आदींचे प्रशिक्षण दिले जात आहे.
पोलीस विभाग व प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ॲथलेटिक्स चे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व पोलीस मुख्यालय गोंदिया येथे करण्यात आलेले होते.
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत हस्तांदोलन करून विद्यार्थ्यांचा परिचय करून घेतला विद्यार्थ्यांच्या खेळाविषयी माहिती घेतली तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्याची मागणी करण्याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांना निर्देश दिले. योग्य तो समतोल आहार व नियमित सरावाने तुम्हाला हवं ते ध्येय साध्य होऊ शकतं असे सांगितले व सराव शिबिराला भेट देण्याचे आश्वासन दिले.
याआधी सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी पोलीस मुख्यालयाला भेट दिली तेथे श्री.शेंडे यांनी विद्यार्थ्यांना 10 मीटर एअर रायफल या खेळाचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी फायर सेम्युलेटर हॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. बी.डी.डी.एस.,श्वान पथक व आधुनिक हत्यारांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन श्वान पथकाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सुद्धा पोलिस विभागाकडून करून दाखविण्यात आले. श्री रमेश चाकाटे राखीव पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोलीस मुख्यालयामध्ये असलेल्या वेगवेगळ्या विभागांची ओळख करून देऊन या विभागाचे कामकाज कशा पद्धतीने चालते याची प्रत्यक्ष माहिती दिली.
यावेळी सोबत श्रीकांत हत्तीमारे पोलीस उपनिरीक्षक, मार्टिन, उईके तसेच प्रकल्प कार्यालयातील दीपेश मांडे,निशा भोंगाडे प्रशिक्षक कचलाम व वाढिवे उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी उन्हाळी सराव शिबिराबाबतची माहिती पोलीस अधीक्षक यांना दिली .
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी प्रकल्प कार्यालय आदिवासी मुलांच्यासाठी राबवित असलेल्या उन्हाळी शिबिराबाबत समाधान व्यक्त केले. तसेच अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी पोलीस विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करून आपले व आपल्या समाजाचे नाव मोठे करावे असे विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें