सामूहिक विवाह सोहळ्यामुळे आदिवासी समाज एकसंघ होईल- आ.संजय पुराम

आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्यात 140जोडपे विवाहबद्ध

देवरी : आदिवासी समाज हा अत्यंत गरीब असून राजकारण्यांच्या इच्छाशक्ती अभावामुळे समाजाचा विकास होऊ शकला नाही.विविध गटात हा समाज विभागला गेला असल्याने या समाजाला एकसंघ करण्याकरिता या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आ.संजय पुराम यांनी केले.या विवाह सोहळ्यात 140 दाम्पत्य विवाहबद्ध झाले. सविता संजय पुराम व मित्र परिवार तसेच माँ धुकेश्वरी मंदिर समिती देवरी द्वारा आयोजित शासकीय आश्रमशाळा पुराडा च्या प्रांगणात 18रोज रविवारला आयोजित भव्य आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खा. नामदेव किरसान, जी.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर,संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर, सुरेश हर्षे उपाध्यक्ष जी.प.गोंदिया, लक्ष्मण भगत सभापती, माजी आ.केशवराव मानकर, भैरसिंग नागपूरे ,माजी जिल्हाध्यक्ष येशूलाल उपराडे,विजय शिवणकर, रजनी कुंभारे सभापती जी. प.,पौर्णिमाताई ढेंगे सभापती जी. प.गोंदिया,दिपाताई चंद्रिकापुरे सभापती जी. प.गोंदिया,अमररत्न तवाडे महाराज,प्रमोद संगिडवार सभापती कृ.ऊ.बा. स.देवरी नगराध्यक्ष संजू उईके, अनिल बिसेन सभापती पं. स. देवरी,जी. प.सदस्य उषाताई शहारे,दुष्यंत किरसान,प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, मंचावर उपस्थित होते.पुढे बोलताना पुराम म्हणाले की,समाजाचा विकास करायचा असेल तर सामूहिक विवाह काळाची गरज आहे. तर यावेळी खा.नामदेव किरसान म्हणाले की,राजकारण बाजूला ठेवून आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकत्र येणे आवश्यक असून पुराम परिवाराने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून वधू वरांना आशीर्वाद दिले. प्रस्तावनातून सविता पुराम यांनी यावर्षी 140जोडपे सामुदायिक रित्या विवाहबद्ध झाले.यंदाचे पहिले वर्ष आहे.यापुढे ही संकल्पना धोरणात्मक निर्णयामध्ये रूपांतरित करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक चेतन उईके यांनी तर उपस्थितांचे आभार अँड.प्रशांत संगिडवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय पुराम मित्र परिवार,प्रकल्प अधिकारी कार्यालय देवरीचे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी तसेच देवरी तालुक्यातील सरपंचांनी परिश्रम घेतले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें