
जिप शाळेची आस्था डोये तालुक्यातून अव्वल
देवरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवार १३ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या निकालात देवरी येथील पीएमश्री जिल्हा परीषद हायस्कूलची विद्यार्थीनी आस्था संजय डोये या विद्यार्थीनीने ९७.८० टक्के गुण घेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, तब्बल ५ वर्षे बंद राहिलेल्या या शाळेच्या विद्यार्थीनीने तालुक्यातून प्रथम येत शाळेचे नाव लौकीक केले आहे.
पीएमश्री जिप हायस्कूल ही शाळा सन २०१३ ते १८ या काळात बंद पडलेली होती. या वर्षी शाळेचा निकाल ९६ टक्के निकाल लागला असून नकुल रामाजी ढोबले ८६.८० द्वितीय, यश प्रभू मनगटे ८६.०० घेत सरस ठरले. शाळेतील ६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी गुणवत्ताधारक १३ विद्यार्थी, प्रथम श्रेणी २१ व द्वितीय श्रेणीत ११ विद्यार्थी राहिले. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक दीपक कापसे यांनी भविष्यात या शाळेची प्रगती अधिकाधिक वाढवण्याच्या संकल्प व्यक्त केला.
शाळेचे अध्यक्ष राजू चांदेवार व शाळा समिती अध्यक्ष जिप सदस्य संदीप भाटिया, उपाध्यक्ष अर्चना ताराम यांनीही भावी काळात अशेच सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. वर्ग शिक्षक टेटे व इतर सर्व विषय शिक्षक यांनी वरील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात खूप मेहनत घेतली. यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, शिक्षण विस्तार अधिकारी एच.जी. राऊत, गट समन्वयक धनवंत कावळे, केंद्रप्रमुख ओमप्रकाश ढवळे,तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
…