ब्लॉसम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे १०च्या परीक्षेत सुयश

देवरी – येथील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी SSC परीक्षा -2025 ( इंग्रजी माध्यम) परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत विद्यालयाचा निकाल दरवर्षी प्रमाणे 100 टक्के लागला आहे.यामध्ये इंग्रजी माध्यमातील निकिता बोहणे 86.40 टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम क्रमांक , रिया राऊत 84.80 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक , साध्य थोटे 80.80 % तृतीय क्रमांक पटकावून ब्लॉसम पब्लिक स्कूल चे नाव लौकिक केले.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, वर्गशिक्षक नामदेव अंबादे , नितेश लाडे , वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे , तेजस्विनी नंदेश्वर, रविना मुनेश्वर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Share