800 रुपये लाच भोवली, तलाठी एसीबीच्या जाळयात

कोहमारा:शेतीचे वारसान फेरफार करण्यासाठी लाच मागणार्‍या महिला तलाठीला (ग्राम महसूल अधिकारी) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अश्विनी शंकर ठोंबरे (24) रा. रांजोना, ता. वसमत जि. हिंगोली ह. मु. कोहमारा, ता. सडक अर्जुनी असे लाचखोर महिला तलाठीचे नाव आहे. ही कारवाई 8 मे रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली तलाठी कार्यालयात करण्यात आली.

सविस्तर असे की, तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांच्या आईचे निधन नोव्हेंबर 2023 मध्ये झाले. आईच्या नावे असलेल्या चिखली येथील शेत जमिनीचे सात बारा उतार्‍यावर तक्रारदार व त्यांच्या भाऊ, बहीणींच्या नावाची नोंद घेण्यासाठी चिखलीच्या तलाठींकडे अर्ज केला होता. तलाठी अश्विनी ठोंबरे यांनी फेरफार नोंद घेण्यासाठी शेतकर्‍याला 1000 रुयाची लाच मागीतली. मात्र शेतकर्‍याला लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीचे पडताळणी करून 8 मे रोजी सापळा कारवाई करण्यात आली. तडजोडीअंती आरोपीने तक्रारदाराकडून पंचासमक्ष 800 रुपये लाच रकमेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयार दर्शवीली. सदर रक्कम आरोपी खाजगी इसम ओमकार ताराचंद शेंडे (52) रा. कोहळीटोला ता. सडक अर्जुनी याच्या मार्फत पंचासमक्ष स्वीकारली. लाच रकमेसह दोन्ही अरोपीतांना ताब्यात घेत डुग्गीपार पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.आरोपी अश्विनी ठोंबरे यांच्या अंगझडतीत रोख 250 रुपये, मोबाईल फोनख् तर आरोपी ओमकार शेंडेच्या अंगझडतीत लाच रक्कम 800 रुपये, इतर रोख 1800, मोबाइल फोन मिळुन आला. दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेण्यात येणार आहे. ही कारवाई प्रधान पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, फौजदार चंद्रकांत करपे, पोलिस हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, पोलिस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, कैलाश काटकर, प्रशांत सोनवणे महिला पोलिस शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक पोलिस शिपाई दीपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें