जनता शिक्षक महासंघाची तालुका कार्यकारीणी विस्तार सभा

देवरी १: गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे जनता शिक्षक महासंघाची देवरी तालुका कार्यकारीणी विस्तार सभा लक्ष्मण आंधळे जिल्हाध्यक्ष ज.शि.म.गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली व सुरेश सिंह कश्यप यांच्या प्रमुख उपस्थितीत सानेगुरुजी सभागृह देवरी येथे गठीत करण्यात आली.

तालुका कार्यकारीणीमध्ये जनता शिक्षक महासंघाचे तालुका अध्यक्ष म्हणुन दिपक एम. कापसे यांची नियुक्ती करण्यात आली असुन सचिव नंदकुमार भोयार, उपाध्यक्षपदी सी.के.निनावे,पी.पी.घुगे, सचिन सांगळे, बी.यु.मुंढे,के.वाय.आव्हाड, कार्यवाह-अमोल खंडाईत, सहकार्यवाह, प्रकाश शहारे, जी.टी.वलके, प्रसिद्धीप्रमुख शरद बोंद्रे, तर सदस्यपदी विष्णु टेकाळे, एस.बी.मडावी, रवी जाधव, केवळराम सलामे, आशिष चौरे, माधव बडे, नजन सर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटनेचे उद्दिष्ट व कार्य यावर प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

शिक्षकांचे विविध प्रश्न पंचायत समिती व जिल्हापरिषद स्तरावरील सोडवण्या विषयी चर्चा करण्यात आली व पुढील सभेत निवेदन देण्याविषयी ठरविण्यात आले. संघटनेला बळ देण्यासाठी शिक्षकांनी या समितीचे सदस्य व्हावे असे आव्हान करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार सचिन सांगळे यांनी मानले.

Share