प्रतिनिधी
देवरी ०१- चिचगड पासून अंदाजे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुटाना गावात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली असुन भुमाला शिवराज मेश्राम असे मृत महिलेचे नाव आहे अंदाज़े वय 35 वर्ष. ही महिला रविवारी रात्री जेवण करून घरच्या सह झोपी गेली आणि नंतर झोपेतुन महिला उठून आपल्या शेतात असलेल्या विहिरीकडे गेली आणी तिथे जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्यामागे एक 14 वर्षाची मुलगी आणि पती असा परिवार आहे या प्रकरणाची नोंद चिचगड पोलिस स्टेशनला अप क्रमांक 174 अंतर्गत दाखल करण्यात आले आणि याचा तपास पीएसआय इसकापे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोनजाल करीत आहे








