
पुराडा, पिपरीया, चिरचाळबांध येथे आरोग्य केंद्र मंजूर करा : आ. संजय पुराम
देवरी : तालुक्यातील पुराडा , सालेकसा तालुक्यातील पिपरिया, आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध गावात प्राथमिक आरोग्य केंद्राला त्वरित मंजुरीद्या, असे निवेदन आ. संजय पुराम यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना दिले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील जिल्ह्यात पिपरिया, चिरचाळबांध, व पुराडा ही गावे प्राथमिक आरोग्य केंद्र नसलेले जिल्हा परिषद गट प्रभाग आहे. यामुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळावी, यासाठी आ. पुराम यांनी आरोग्य मंत्री ना. आबिटकर यांचेशी चर्चा केले. पिपरिया, चिरचाळबांध, पुराडागावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सालेकसा तालुक्यातील विचारपूर, बिझली, पांढरवाणी, बोदलबोडी, कोटजभूरा, मुरकुटडोह/ दंडारी, गांधींटोला, पाऊलदौना, आमगाव तालुक्यातील सीतेपार, सुरकुडा, बोरकन्हार, देवरी तालुक्यातील आमगाव, सुंदरी, इस्तारी, पळसगाव/धमदी, पीपरखारी, गडेगाव, मुरपार, व चादलंमेटा येथील आरोग्य उपकेंद्राचे प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आले असून निवेदन देते वेळी या संदर्भात आ. पुराम यांनी आरोग्य मंत्री ना. आबिटकर यांचेशी सविस्तर चर्चा करून तात्काळ प्रभावाने मंजुरी प्रदान करण्यात यावे असा आग्रह केला. यावर लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.