उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने डॉ. अरुण झिंगरे सन्मानित

देवरी : मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देवरी येथील प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे यांना उत्कृष्ट प्राचार्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य माहिती सहाय्यता केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर पुरस्कार वितरण सोहळा नागपूर येथील धनवटे नॅशनल सायन्स कॉलेज येथे आयोजित करण्यात आला होता.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यामार्फत सुरू असलेल्या करियर कट्टा हा उपक्रम त्यांनी महाविद्यालयांमध्ये यशस्वीरित्या राबविल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट प्राचार्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच महाविद्यालयाचे करियर कट्टा समन्वयक डॉ. रोशन नासरे यांना गोंदिया जिल्हा उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अरुण झिंगरे व डॉ. रोशन नासरे यांना मिळालेल्या विद्यमान पुरस्काराबद्दल महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Share