
ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
देवरी : ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील महिला शिक्षिकांना मान देऊन प्रमुख अतिथींचे स्थान देण्यात आले होते. वैशाली मोहुर्ले, सरिता थोटे , कलावती ठाकरे , मनीषा काशीवार , संगीता काळे, तनुजा भेलावे, नलू टेंम्भरे, रविना मुनेश्वर , योगिता कोसरकर, तेजस्विनी नंदेश्वर , आरती चौधरी , दामिनी कुमोटे, आकांक्षा डिब्बे उपस्थित होते. सादर कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी केले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिला शिक्षिकांना प्राचार्यांनी भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या . सर्वानी आपले मनोगत व्यक्त केले . पुरुष प्रधान संस्कृतीतून महिलांचा पुढाकार या विषयावर चर्चा करण्यात आली . सदर कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व पुरुष शिक्षकांनी सहकार्य केला . कार्यक्रमाचे सूत्र संचालन आस्था अग्रवाल आणि मेघा तवाडे यांनी केला असून आभार प्रदर्शन संचिता श्रेया रेलकर विद्यार्थिनींनी मानला.