वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवा

गोंदिया: वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड किंवा बनावट नंबरप्लेटचा वापर करून अनेकदा गुन्हे केले जातात. अनेकदा रस्त्यावरून धावणार्‍या वाहनांची ओळख पटत नाही. त्याचा विचार करून परिवहन विभागाने नंबर प्लेटमध्ये होणारी बनवाटगिरी रोखून त्याचे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणार्‍या वाहनांची ओळख तत्काळ पटावी या हेतूने राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्देशाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. 31 मार्चपर्यंत सर्व वाहनधारकांना ती नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांवर कारवाईचाही बडगा उगारण्यात येणार असल्याचे आरटीओच्या सुत्रांनी सांगीतले.

वाहनांचा वापर अनेकदा अवैधरीत्या केला जातो. मुदतबाह्य वाहनेही रस्त्यावर धावतात. बनावट नंबरप्लेट तयार करूनही वाहनांचा वापर गुन्ह्यांसाठी केला जातो. बनावट नंबरप्लेटवरून वाहनधारकांची ओळख पटत नाहीत. त्यामुळे संबंधित गुन्ह्यांतील संशयितांचा शोध लावणे कठीण जाते, अशा वाहनांमुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.  याचा विचार करून परिवहन विभागाने आता नंबर प्लेटमध्ये होणारी बनवाटगिरी रोखून त्याचे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणार्‍या वाहनांची ओळख तत्काळ पटावी या हेतूने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. यासाठी 31 मार्चपर्यंत सर्व वाहनधारकांना सदरहू नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांवर कारवाईचाही बडगा उगारण्यात येणार आहे.

शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. विभागनिहाय परिवहन विभागाने एजन्सी नियुक्त केली आहे. एचएसआरपी नंबर प्लेटसाठी वाहनधारकांनी संकेत स्थळावर उपलब्ध आहे.   या पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बसवावी. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवणे बंधनकारक असून 31 मार्चपर्यंत मुदत आहे. मुदतीत सर्व वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें