देवरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचे उद्घाटन 8 फेब्रुवारीला

देवरी : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीचे न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या हस्ते 8 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालय मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती नितीन सांबरे व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया राजेश जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

नागरिकांनी या समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका विधीज्ञ संघ देवरीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर देवरीच्या सुलभा चरडे यांनी केले आहे.

Share