मनोहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Deori: स्थानिक मनोहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती बालिकादिन म्हणून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जी.एम.मेश्राम, मुख्याध्यापक व्ही.एस.गेडाम, उपमुख्याध्यापक एस.टी.हलमारे, पर्यवेक्षक डी.एच.ढवळे, शाळा उपप्रमुख राजू कारेमोरे, आर.पी.मोहुर्ले, अशोक गेडाम कु.छाया धांडे ,शुभांगी गजभिये मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मी सावित्री बोलतेय असे एकपात्री प्रयोग करून लोकांचे मनोरंजन केले.सावित्रीबाईंच्या जीवनावर अनेक अजरामर गीत, गाणी, भाषणे करून सावित्रीबाईंचे गुणगान गायले.माननीय अध्यक्षांनी सावित्रीबाई म्हणजे एक चालत बोलत विद्यापीठ अशा आशयाचे भाषण केले.
अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपु्र्वा लेंडारे हिने केले तर आभार सुवर्णदिव्या सिंगोले हिने मानले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो प्रमुख जगदीश खेडकर व सर्व स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Share