पोलीस रेझिंग दिनानिमित्त हरवलेले १३ मोबाईल फोन परत
देवरी: गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कॅम्प देवरी, विवेक पाटील, उपविभागिय पोलीस अधिकारी देवरी, यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे प्रविण डांगे पोलीस निरिक्षक देवरी यांचे आदेशान्वये पोलीस ठाणे देवरी हद्दीतील हरविलेले मोबाईल शोध संबधाने CEIR प्रणालीचा वापर करुन १३ मोबाईल ज्यात, वनप्लस, विवो, सॅमसंग, रियलमी, ओप्पो, रेडमी, मोटोरोला हे मोबाईलचा शोध देवरी पोलीसाद्वारे घेण्यात आले होते.
दिनांक ०३/०१/२०२५ रोजी देवरी पोलीसांनी शोध घेतलेले विविध कंपनीचे १३ मौल्यवान मोबाईल पोलीस रायझिंग डे च्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे,यांचे हस्ते अर्जदारांना (मालकांना) परत करण्यात आले. अर्जदारांनी मोबाईल शोधुन मिळाल्याने गोंदिया पोलीस दल व देवरी पोलीसांचे आभार मानले आहे. सदर मोबाईल शोध पो.शि. गोपालप्रसाद पांडे, ब.न. १४५० यांनी केली.