बस कोणत्या गावापर्यंत आली? अॅपवर पाहा, नंतर घराबाहेर पडा !

गोंदिया : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम’द्वारे नवीन वर्षापासून प्रवासी, त्यांच्या नातेवाइकांना ‘लालपरी’चे लोकेशन मोबाइलवर कळणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आपली बस केव्हा येणार, हाच एक प्रश्न सतावत असतो. आता प्रवाशांची ही चिंता दूर झाली आहे. त्यांना हवी असलेली बस कुठे आहे, किती वेळात स्थानकावर येणार, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर मिळणार आहेत. ‘एमएसआरटीसी अॅप’च्या माध्यमातून मोबाइलवर एसटी कुठे

सिस्टम’ थांबली, केव्हा पोहोचेल याची इत्थंभूत माहिती कुठूनही मिळणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता ‘व्हेइकल ट्रॅकिंग ‘एमएसआरटीसी कॉम्प्युटर’ है नवीन अॅप असून, रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एसटी महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे. हे जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम या यंत्रणेमुळे शक्य होणार आहे.

Share