राज्यातील आश्रमशाळांची वेळ ११ ते ५ करा : आ.संजय पुराम

आदिवासी मंत्री उईके यांच्याकडे केली मागणी

देवरी : आश्रमशाळांची सध्याची वेळ सकाळी ८:४५ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत अशी आहे. ही अमानवीय असून विद्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांना मानसिक तसेच शारीरिकदृष्ट्या आणि शालेय अध्ययन-अध्यापनाच्या दृष्टीने उचित नाही. करिता राज्यातील आश्रमशाळांची वेळ बदलून सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत करा, अशी मागणी आमदार संजय पुराम यांनी आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र शासनातर्फ आदिवासी विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या वेळेत बदल करावा याबाबत बऱ्याच शिष्टमंडळांनी आमदार आदिवासी पुराम यांच्याकडे साकडे घातले होते. त्याच अनुषंगाने शुक्रवारी (दि. २७) मुंबई मंत्रालयात आमदार पुराम यांनी आदिवासी विभागाचे मंत्री उईके यांची भेट घेतली. भेटीत आमदार पुराम यांनी, राज्यशासनाने शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना ८ः४५ते ४ हे नवीन वेळापत्रक लागू केले आहे. हे वेळापत्रक लागू करताना कशाचाही विचार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ८ः४५ ते ४ ही वेळ विद्यार्थी, शिक्षक व इतर शालेय प्रशासनापैकी कोणाच्याही सोयीचे नाही. करिता हे वेळापत्रक बदलून आश्रमशाळांची वेळ पूर्वीप्रमाणे ११ ते ५ करावी, अशी मागणी करीत निवेदन दिले. निवेदन देताना नगराध्यक्ष संजू उईके, माजी खासदार अशोक नेते वपदाधिकारी उपस्थित होते. ना. उईके यांनी आश्रमशाळांची वेळ पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले

Share