मद्यपान करून शाळेत आलेल्या झेड.पी गुरुजीवर गुन्हा दाखल
मद्यप्राशन करून शाळेत गोंधळ घालणाऱ्या शिक्षकावर कारवाई
आमगाव: तालुक्यातील पदमपुर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एका मद्यप्राशन करून एका शिक्षकांनी चांगलाच गोंधळ घातला. शिक्षकाचा गोंधळ विद्यार्थी व उपस्थित शिक्षकाने चांगलाच अनुभवला. ही घटना ०७ डिसेंबरच्या सकाळी १०:३० वाजता च्या सुमाराची आहे. याप्रकरणी दारुड्या शिक्षकाविरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काशीराम दूलीराम चौरागडे (५१) असे त्या दारुड्या पदवीधर शिक्षकाचे नाव आहे.
फिर्यादी महिला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पदमपुर येथे जुलै-२०२४ पासून उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.०७ डिसेंबर रोजी फिर्यादी महिला व इतर शिक्षक विद्यार्थी शाळेत पोहोचले. त्यातच पदवीधर शिक्षक काशीराम चौरागडे हा देखील नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत शाळेत पोहोचला. दरम्यान दारुड्या शिक्षक काशीराम चौरागडे यांनी भर शाळेत चांगलाच धिंगाणा घातला. यावेळी उपस्थित शिक्षकाने चौरागडे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.मात्र दारूच्या नशेत भान विसरलेल्या शिक्षकाला शाळा आणि आपले गोंधळ कळू शकले नाही. यामुळे शाळेत काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. फिर्यादी मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात दारोड्या शिक्षकाविरुद्ध कलम ८५(१) मदका अनवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उईके करीत आहेत.