भर्रेगाव येथे सात दिवसीय शिबीराचा समारोप सोहळा

Deori: मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक भर्रेगाव येथे दाखल झाले.या मुक्कामी शिबीराचे उद्घाटन जी.टी.सिंगनजुळे खंडविकास अधिकारी पंचायत समिती देवरी यांच्या हस्ते प्राचार्य जी.एम.मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ संपन्न झाला.प्रमुख अतिथी भर्रेगावचे सरपंच लखनलाल पंधरे,कु.जे.के.डाबरे ,मुन्नीबाई उसेंडी,योगराज साखरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या शिबिरात बौद्धिक कार्यक्रमाच्या श्रुंखलेत स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण संरक्षण या विषयावर प्राध्यापक एस.पी.देशमुख यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.स्वच्छ सुंदर गाव म्हणून रासेयो स्वयंसेवकांनी रस्ते सफाई केली.गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारा बांधला.अंथश्रद्धा निर्मूलन व समुपदेशन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.एच.ढवळे पर्यवेक्षक, कु. एस. व्ही.भुरे यांनी अंधश्रद्धा निर्मुलन या विषयावर भोंदू लोक सामान्य माणसाची कशी लुबाडणूक करतात हे प्रयोगाने सिद्ध करून लोकांच्या मनात असलेली भिती दूर केली. अंबुले सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डी.एच. ढवळे सरांनी विनोदबुद्धीने अंधश्रद्धा कशी भयानक आहे याचे चित्र समाजापुढे उभे केले.व्यवसाय मार्गदर्शन एम.जी.गेडाम यांनी कोणताही व्यवसाय करण्याची लाज बाळगू नये, असे विचार मांडले. ए.एस.मेश्राम,पी.व्ही. कापगते यांनी भरीव मार्गदर्शन केले.
शिबीराच्या सहाव्या दिवशी माके.सी. शहारे माजी प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सोहळा पार पडला.प्रमुख अतिथी एस.टी.हलमारे उपमुख्याध्यापक, लखनलालजी पंधरे सरपंच,सौ.संध्याताई बहेकर पो्.पा. यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.अशा समारोपीय सोहळ्याचे सूत्रसंचालन अश्विनी झंजाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन जे.जी.खेडकर यांनी मानले.सर्व शिबीरार्थ्यांनी शिबीराच्या यशासाठी प्रयत्न केले.

Share