राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे भर्रेगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर
PraharTimes: मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी, जिल्हा -गोंदिया येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती देवरीचे खंडविकास अधिकारी माननीय जी.टी.सिंगनजुडे , अध्यक्षस्थानी प्राचार्य जी.एम.मेश्राम , भर्रेगाव ग्रामपंचायतचे सरपंच लखनलाल पंधरे,माननीय कु. जे.के.डाबरे मुख्याध्यापिका, नंदलाल नेताय सदस्य, सौ.मुन्नीबाई उसेंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी माननीय उद्घाटक महोदय सिंगनजुडे साहेबांनी सर्व स्वयंसेवकांनी सेवाव्रती भावनेने कार्य करावे असे आवाहन केले.तसेच जी.एम.मेश्राम सरांनी सर्व स्वयंसेवकांना निष्ठापूर्वक कार्य करून शाळेचे नाव लौकिक करावे,असे मार्गदर्शन केले,अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी झंजाळ यांनी केले तर आभार टी.आर.देशमुख यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो प्रमुख जगदीश खेडकर व सर्व स्वयंसेवकांनी सहकार्य केले.