देवरीत अतिक्रमणावर चालला बुलडोजर.!

प्रहार टाईम्स :  स्थानिक नगरपंचायतच्या हद्दीतील देवरी शहराअंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजुला खुल्या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी टिनाचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवूनही प्रतिसाद न दिल्याने अखेर नगर पंचायत प्रशासनाने दि.०४ डिसेंबर २०२४ बुधवार पासून बुलडोजर, जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्यात येत आहेत.येथील चिचगड मार्गाच्या दोन्ही बाजूलगत खुल्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता कित्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी टिनाचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. नगर पंचायत प्रशासनाने पाच दिवसांपूर्वी या व्यावसायिकांना अतिक्रमणाबाबत नोटीस बजाविली होती. अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र व्यावसायिकांनी या नोटीसची दखल घेतली नाही. बुधवार सकाळ पासूनच चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येत आहेत. 

नगरपंचायत प्रशासनाची ही कारवाई पाहून काही व्यासायिकांनी स्वत: पुढाकार घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण काढले.कित्येक व्यावसायिकांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढून साहित्य नगर पंचायतीत जमा करण्यात आले. यापुढेही अतिक्रमण हटविणे सुरूच राहणार असून, कोणताही गवगवा न करता ही मोहीम राबविणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी जागृती रणदिवे यांनी सांगितले.नगर पंचायत प्रशासनाने सदर अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने शहरांतर्गत रस्ते आवागमनासाठी आता मोकळे झाले आहेत. नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

Share