संपादकीय: आमगाव विधानसभा निवडणुक: मतदार कोणाचे दिवाळे काढणार?

भुपेन्द्र मस्के
उपसंपादक प्रहार टाईम्स न्युज नेटवर्क

आमगाव/देवरी:निवडणूक आयोगाने ऐन दिवाळीच्या मोसमात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया राबविल्याने राजकिय कार्यकर्ते नाविण्यपूर्ण प्रचार यंत्रणेच्या साहित्यावर आमगाव विधानसभेतील राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर निघाल्याने यांचा लाभ कोणत्या पक्षाला मिळते यावर सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. आमगाव विधानसभेत निवडणूकीची तयारी करणारे वर्ष दोन वर्षांपासून विविध माध्यमांतून प्रचार साहित्यावरचा खर्चाचे आकडे उपलब्ध नसले तरी हा खर्च मात्र लाखोच्या घरात करतांना उमेदवार दिसुन आले. एका इच्छुकाने तर प्रचार साहित्य, रॅली, मोर्चा इतर बाबींवर करोडो खर्च करुनही तिकीट नाकारली गेली. मतदार संघातील विविध उपक्रमांवर इच्छुकांनी सढळ हस्ते विविध गावातील विविध मंडळांना मदत केली.असे असले तरी मतदार आपल्याला पसंती देतील कि नाही यावर उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.

ज्यांना मोठ्या राजकीय पक्षांची तिकीट मिळाली त्यांचे फावले. ज्यांना माकड उड्या मारुनी तिकिट मिळाली नाही त्यांच्या तयारीवर पाणी फेरले गेले. काही तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीत उडी घातली आहे. असे असले तरी आपणच विजयी होण्याची आशा उमेदवारांमध्ये आहे. काहींची मिठाई तर विजया पुर्वीची वाटल्या गेली. मात्र दिवाळीची मिठाई कुणाची गोड होणार यावर हे निकालानंतरच कळेल. मतदार एका उमेदवारांची नक्कीच दिवाळी तर बाकीच्यांचे दिवाळे काढणार आहे.

Share