शिरपूर येथील जुगार अड्ड्यावर धाड ; ३.६८ लाखाचा माल जप्त
देवरी: जंगलात बसून जुगार खेळत असलेल्या चौघांना पोलिसांनी धाड घालून रंगेहात पकडले. देवरी तालुक्यातील ग्राम शिरपूर येथील जंगल परिसरात शनिवारी (दि.२) ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या कारवाई ३ लाख ६८ हजार रुपयांच्या माल जप्त केला आहे. शिरपूर येथील जंगल परिसरात काही जण जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलात धाड घातली असता, त्यांना आरोपी चैतराम हरी किसन बावणे(४६),शुभम राजू शेंडे(२१), विशाल कैलास ताराम (२४) व दीपक आसाराम कोसळकर (३६ सर्व रा. शिरपूर बांध) ताशपत्ते खेळत असताना, रंगेहात मिळून आले. पोलिसांनी त्यांना पकडले असून, घटनास्थळावरून चार मोबाईल, १० हजार ८९० रुपये रोख व मोटरसायकल क्रमांक एम.एच. ३५ ए.टी. ३२८१ किंमत ९० हजार रुपये, सी.जी.२२ टी २३५६ किंमत पन्नास हजार रुपये, एम.एच. ३५ ए.वाय.७६२० किंमत ८० हजार रुपये व एम.एच.३५ ए.टी.६६६० किंमत ८० हजार असा एकूण तीन लाख ६८ हजार १४० रुपयाचा माल जप्त केला. सदर कारवाई पोलीस शिपाई अरविंद पाथोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असून, आरोपीवर महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार कोरोंडे करीत आहेत.