पावसामुळे पाखर झालेल्या धानाचे त्वरित पंचनामे करा: अध्यक्षा तितराम
देवरी : तालुक्यातील ग्राम डवकी येथील विविध आदिवासी विविध कार्य. सह. संस्था मर्यादित डवकी र.नं.१३२४ अंतर्गत खरेदी केंद्र भर्रेगाव येथील खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये एकूण खरेदी १०७२७.०५ क्वि. व पोती २६८१८ झालेली आहे.त्यापैकी साठा पुस्तकाप्रमाणे शिल्लक ५४०.६१ क्विं. व पोती संपूर्ण जावक झाले असून,यावर्षी पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे, ताटपत्री मधून पाणी शिरून धान्याचे पोती अंकुरलेल्या गेल्या आहेत.भरडाई विलंब झाला. त्याचप्रमाणे केंद्राला पावसामध्ये डी.ओ.मिळून,भर पावसाळ्यात जावक झाले. तसेच यावर्षी उन्हाळ्यामध्ये तापमान ४० डिग्री च्यावर गेल्यामुळे, ताटपत्रीला लागून असलेली पोती काळी झाली आहेत. दि. ३ जुलै २०२४ पासून धानाची जावक सुरू झाली.व दि.०५ जुलै २०२४ पासून सतत पाऊस आल्याने, जमीन दलदली झाली. त्यामुळे खालच्या थरातील धान पाखर झाला आहे. यामध्ये अंदाजे ३०० क्विं. धान पाखर झालेला आहे.
वरील सर्व कारणामुळे व इतरही नैसर्गिक कारणामुळे खरेदी केलेला माल हा पाखर तसेच काळसर झालेला आहे. तरीपण गोडावून मध्ये शिल्लक असलेला धानाचा पंचनामा करून आपल्या ताब्यात घ्यावा अशी मागणी गोमतीताई तितराम अध्यक्ष तसेच संचालक मंडळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित डवकी च्या वतीने प्रादेशिक व्यवस्थापक, कार्यालय भंडारा यांना केली आहे.